Breaking News

जिंतूर रँडोनिअर्सच्या 600 किमी ब्रेवेट स्पर्धा ठरली ऐतिहासिक *ऊन,वारा, पाऊसाला न जोमानता 17 सायकलस्वारांनी गाठला पल्ला

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

जनसमर्थक* परभणी, जळगाव, जामनेर, चाळीसगांव, नाशिक येथील सायकलस्वारांचा सहभाग
जिंतूर रँडोनिअर्सच्या सायकल क्लबच्या वतीने शुक्रवार 24 सप्टेंबर रोजी सकाळी 4 वाजता 600 किमी ब्रेवेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील सहभागी परभणी, जळगाव, जामनेर, चाळीसगांव, नाशिक येथील 17 सायकलस्वारांनी ऊन,वारा, पाऊसाला न जोमानता सलग 39 तास सायकलिंग करून 600 किमीचा लांब पल्ला यशस्वी गाठून जिंतूर रँडोनिअर्सचा नवीन इतिहास रचला आहे.
ऑडाक्स इंडिया या राष्ट्रीय सायकल क्लबशी संलग्नित असलेल्या जिंतूर रँडोनिअर्स सायकल क्लबने लांब पल्ल्याच्या सायकलिंगमध्ये मनाचे मानले जाणारे सुपर रँडोनिअर्सचे स्वप्न पाहणाऱ्या सायकल स्वरांचे स्वप्न प्रत्येक्षात आणण्याकरिता शुक्रवार 24 सप्टेंबर रोजी जिंतूर-सेलू-मानवत रोड-पाथरी-माजलगाव-गढी-मांजरसुबा-येरामाळा-येडशी दरम्यान 600 किमी ब्रेवेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या लांब पल्ल्याच्या सायकलिंगसाठी परभणी, गंगाखेड, जळगाव, जामनेर, चाळीसगांव, नाशिक येथील 22 सायकल स्वारांनी सहभाग घेतला होता. सहभागी सायकलस्वारांना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बालरोगतज्ज्ञ डॉ गणपत वाघमारे, डॉ सविता वाघमारे, शालेय योगासन स्पर्धेत पदक विजेते वैभवी शिंदे, पोर्निमा देशमूख, श्रेया घिके, सानवि घिके आदींनी झेंडी दाखवली. 600 किमीचा पल्ला गाठण्यासाठी सायकलस्वारांना 40 तासांचा वेळ देण्यात आला होता. संबंध 600 किमीच्या अंतरात कधी ऊन कधी पाऊस तर कधी तीव्र वारा असतांनाही 22 पैकी शरद काळे पाटील, उन्मेष मारवाडे विनोद पाटील, सूर्या बडवणे, संतोषकुमार चव्हाण, वैभव ठाकूर, प्रद्युम्न शिंदे, कामिनी धांडे, पूनम रणदिवे, शारदा शिंदे, मनोज चौधरी, विद्याधर इंगळे, बालाजी नारगुडे, उज्वल पडोळे, भाऊसाहेब पाटील, रवींद्र पाटील, अतुल सोनवणे या 17 सायकलस्वारांनी ऊन,वारा, पाऊसाला न जोमानता 600 किमीचा पल्ला यशस्वी गाठला. यशस्वी सायकलस्वारांचे देवेंद्र भुरे, व्यंकटेश भुरे, ज्ञानबा मापारी, शेख शाहरुख, किशोर वानपसारे, शेख अलीम, यासीन खान, नजीर पठाण, राहुल भिसे, मारोतराव भिसे, सचिन भिसे, महेश लोखंडे, दिलीप लोखंडे आदींनी पुष्पहार टाकून गौरव केल

हे हि वाचा

तीन महिला सायकलस्वार ठरले आदर्श
बहुतांश महिला आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण कार्यक्षमतेने पार पाडण्याकरिता आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात परिणामी कमी वयातच त्यांना अनेक गंभीर आजारांच्या सामोरे जावे लागते. अशा महिलांना प्रेरित करण्यासाठी नाशिक येथील शारदा शिंदे, जळगाव येथील कामिनी धांडे, पुनम रणदिवे यांनी 600 किमीचा ब्रेवेट स्पर्धेत सहभाग घेऊन ती यशस्वी पूर्ण केली आहे. त्यांच्या कामगिरीमुळे तिन्ही महिला इतर महिलांसाठी आदर्श ठरले आहेत.

वयोवृद्ध सायकल स्वारांनी दिली प्रेरणा
पन्नाशी पार केल्यानंतर बहुदा व्यक्तींमध्ये आपण कमकुवत झालो आहोत आपण विशिष्ट कार्य करू शकत नाही अशी धारणा निर्माण होते पण जिंतूर रँडोनिअर्सच्या 600 किमीच्या ब्रेवेट स्पर्धेत सहभागी 60 वर्षीय बालाजी नारगुडे, 55 वर्षीय शरद पाटील, 51 वर्षीय विद्याधर इंगळे आदिंनी ही धारणा खोटी ठरवत प्रबळ इच्छाशक्तीच्या 600 किमीचा लांब पल्ला सहजतेने पूर्ण करून इतरांना प्रेरणा दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close