नगर परिषद जिंतूर अंतर्गत विविध विकास कामांचे मा.आ.विजय भांबळे यांच्या हस्ते उदघाटन

संपादक :- अकबर सिद्दीकी
( जनसमर्थक ) जिंतूर :- २६ सप्टे. नगर परिषद जिंतूर अंतर्गत सोनार समाजाची वरुड रोड येथे असलेल्या स्मशानभूमीच्या शुशोभीकरण कामाचे तसेच प्रभाग क्र.७ मधील सी.सी.रोड च्या कामाचे आज रोजी मा.आ.विजय भांबळे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
जिंतूर शहरात सोनार समाज हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांची अनेक दिवसापासून स्मशानभूमीची शुशोभीकरण करण्यात यावे असी मागणी बऱ्याच दिवसापासून होती हि मागणी पूर्ण करण्यासाठी मा.आ. विजय भांबळे यांनी विशेष वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून ३५ लक्ष रुपये मंजूर करून घेतले व सादर काम मार्गी लावले त्यामुळे सोनार समाजातून भांबळे साहेबाचे आभार व्यक्त केले जात आहेत. या कामामध्ये आर.सी.सी.प्रतीक्षा गृह, पेवर ब्लॉक, शौचालय, ग्रेनाईट ओटा, कारंजा,झाडांचे ओटे,सर्व सुरक्षा भिंतीस रंगरंगोटीचे काम केले जाणार आहे.
तसेच जिंतूर शहरातील प्रभाग क्र. ७ मधील खैरी प्लॉट येथे विशेष वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून ३५ लक्ष रुपये मंजूर करून सी.सी.रस्ता कामाचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी श्री रामराव उबाळे (सभापती-समाजकल्याण जि.प.परभणी), श्री बाळासाहेब भांबळे (उप-नगराध्यक्ष न.प.जिंतूर), गुरुकुल चे महेश चैतन्य महाराज, अमृतेश्वर मठातील शिवाचार्य महाराज, संदीप शर्मा महाराज, विनायक टाक महाराज, नगर सेवक मनोहर डोईफोडे, शाहेदबेग मिर्झा, श्यामराव मते, शेख इस्माईल, दत्तराव काळे, उस्मान पठाण, लखुजी जाधव, दलमीर पठाण, अहमद बागबान, बंटी निकाळजे, चंद्रकांत बहिरट, सोहेल सर यांच्यासह शहरातील सोनार समाजाचे प प्रतिष्टीत नागरिक सुरेंद्र कुलथे, आबासाहेब शहाणे, विजय टाक, सुनील कुलथे,कांतराव चिद्रवार तर प्रभाग क्र.७ मध्ये रावसाहेब खंडागळे , बुधवंत साहेब, गीते साहेब, चक्रवार जनार्धन संदीप काळे, गणेश खपसे, गणेश जाधव, अनिल राठोड बालाजी कऱ्हाळे, आपटे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.