Breaking News

मौ कलीम सिद्दीकी यांची सुटका करण्याची मागणी शहरातील विविध संघटनांचे तहसीलदारांना साकडे

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर ;-मध्येप्रदेश राज्य सरकारने आपल्या अधिकार व पदाचा दुरुपयोग करत मौ कलीम सिद्दीकी यांना अटक केली असून त्यांना केलेली अटक ही लोकशाहीची हत्या असून मौलाना कलीम सिद्दीकी यांचयावरील सर्व बिनबुडाचे आरोप मागे घेऊन त्यांची बिनशर्त सुटका करावी अशी मागणी शहरातील अलहुदा फाउंडेशन,जमीयत उलमा ए हिंद, जमाअत ए इस्लामी हिंद,वंचित बहुजन अघाड़ी आदि संघटनाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे
या बाबत गुरुवार दि 30 सप्टेंबर रोजी तहसीलदार मार्फत महा महिम राष्ट्रपती यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की उत्तर प्रदेश मध्ये निवडणुका जवळ आलेल्या असून हिंदू मुस्लिम तेढ वाढवण्यासाठी जाणून बुजून मौ कलीम सिद्दीकी यांचा कोणताही गुन्हा नसतांना त्यांना ए टी एस मार्फत अटक केली आहे त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून हे सर्व आरोप मागे घेत लवकरात लवकर त्यांची सुटका करण्यात यावी.कारण देशात लोकशाही असून ज्याला त्याला आपल्या धर्माचा प्रसार ,प्रचार करण्याचे अधिकार दिलेले आहे मौ कलीम सिद्दीकी यांना अटक म्हणजे भारतीय मुसलींमाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न असून हा लोकशाही ला घातक आहे महामहिम राष्ट्रपती नि यात लक्ष घालून त्याच्या सुटकेचे आदेश देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे
अल हुदा फाउंडेशन च्या वतीने दिलेल्या निवेदनावर फाउंडेशन के अध्यक्ष मौ जलील अहमद मिल्ली,सचिव शेख शकील अहमद,शेख अनवर,सय्यद वसीम,शेख रहीम,मुख्तार खान, मुज्जु सिद्दीकी,शेख इस्माइल,गणि कुरेशी,रहीम खान,शेख गुलजार तर जिमियत उलमा हिन्द च्या वतीने दिलेल्या निवेदनावर मौलाना तजमुल अहमद खां, मौ सिराजोद्दीन नदवी,अ मुखिद,अ रहमान,सय्यद यूसुफ कादरी,सय्यद एजाज तर जमाअत इस्लामी हिन्द च्या वतीने दिलेल्या निवेदनावर अहमद सिद्दिकी,मिर्ज़ा आसिम बेग,जुनैद अंसारी,नुरुल्लाह अंसारी,अजहरोद्दीन सिद्दीकी,हाफिज अनीस खान,शेख फरहान, अरबाज खान,अरफ़ात खान,तर वंचित बहुजन अघाडीच्या वतीने दिलेल्या निवेदनावर शिवाजी वाकळे, इस्माईल हाशमी, हिंमत खिल्लारे, नामदेव प्रधान, हारून लाडले, रहीम राही, किरण सोनवळकर, ऋषि महाजन,सय्यद साबेर, हाफेज इमरान, सतीश वाकळे,शेख सलीम, मुक्तार खा,विश्वनाथ भुक्तर, अनिल महाजन, मधुकर बनकर, रझाक मामु, दिलिप मिस्त्री. आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close