माझा समाज माझीच जबाबदारी होय राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे

संपादक :- अकबर सिद्दीकी
पालम :- राज्यातील गुरव समाज बांधवांनी संघटित होऊन समाजातील प्रत्येक समाज बांधवांचे गरच ओळखत माझा समाज माझीच जबाबदारी ओळखून समाज संघटित करण्याचे काम करावे असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांनी दि. 2 रोजी नरापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या संवाद यात्रेदरम्यान बोलताना व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर मुख्य सरचिटणीस विलास पाटील. सरचिटणीस सुभाष अण्णा शिंदे. प्रदेशाध्यक्ष सुधाकर खराटे मराठवाडा अध्यक्ष रमेश ठाकूर जिल्हाध्यक्ष मारोती नाईकवाडे आदींची उपस्थिती होती
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की
गेल्या अनेक दिवसापासून मी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संवाद यात्रेनिमित्त गावे गावी भेट देऊन समाजातील होणाऱ्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मी द्वारे करत आहे हे करत असतान माझा समाज राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने असतानाही या समाजाकडे राज्यातील कुठल्याही राजकीय पक्षांनी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले नाही यामुळे आज हे समाज विकासापासून वंचित आहे यामुळे राज्यातील सर्व राजकीय पक्षांना समाज संघटित करून समाजाची खरी ताकद दाखवण्याची गरज असल्याचे त्यांनी या संवाद यात्रेदरम्यान बोलताना व्यक्त केली यावेळी त्यांच्या हस्ते समाजाच्या पालम पूर्णा परभणी यासह अनेक तालुक्यातील पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्यायादरम्यान प्रदेशाध्यक्ष सुधाकर खराटे यांनी उपस्थित समाजबांधव समोर विचार म्हणले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय गुरव संघटनेचे राज्य सरचिटणीस गणेश दीक्षित युवा जिल्हाध्यक्ष मनोज वाघमारे प्रसाद ठाकुर नागोराव शिवणखेडे. पालम तालुका अध्यक्ष रमेश ठाकूर पूर्णा युवा अध्यक्ष साईनाथ चौधरी आदींनी प्रयत्न केले