Breaking News

*कोविड 19 काळात अविरत शैक्षणीक कार्य सुरू ठेवण्याबाबत शिक्षकांचा संन्मान*

संपादक :- अकबर सिद्दीकी

चारठाणा ( प्रभाकर कुर्हे चारठाणकर )
कोविड 19 महामारिच्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण देश बंद होता त्याच बरोबर शाळा सुध्दा बंद होत्या परंतु चारठाणा जि. प.गणाच्या सदस्यां मिनाताई राउत यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या हाकेला साद देत खुप मोठी जबाबदारी पेलुन शाळा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आणी 100 दिवस पुर्ण झाले त्यामुळे या कोरोणा काळात कोरोणा सैनिकाचे कार्य करणार्या शिक्षकांचा संन्मान आज दि. 8 आॅक्टोबर रोजी येथील सावता मंदिर येथे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प.परभणी सदस्या मिनाताई राउत, मार्गदर्शक म्हणून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी आशाताई गरुड मॅडम, तर प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी सुभाष आम्ले, ओ. बि.सी नेते नानासाहेब राउत, सरपंच अनिरुद्ध चव्हाण, ग्राम विकास अधिकारी आम्ले आदी सह पत्रकार, ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते तर सत्कार मुर्ती म्हणून चारठाणा सर्कल मधिल शाळांचे शिक्षण उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close