Breaking News

*जागतिक टपाल दिनीच जिंतूर पोस्ट ऑफिस मधील कामकाज खोळंबले, आठ दिवसापासून व्यवहार बंद

संपादक :- अकबर सिद्दीकी

प्रदिप कोकडवार :- जिंतूर
आज जागतिक टपाल दिन परंतु जिंतूर पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क केला असता
चक्क आठ दिवसापासून येथील बँकिंग कामकाज इंटरनेट बंद असल्यामुळे खोळंबले आहे
नाहक ग्राहकांना त्रास असून आर्थिक व्यवहार थांबले असल्याचे आज उघड झाले
अधिक माहिती अशी की येथील पोस्ट ऑफिसला 2G व 4G अश्या BSNL कंपनीच्या दोन इंटरनेट लाईन असून 4G सुविधा दि 1 ऑक्टोबर पासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली
येथील संगणकीय प्रणालीत 4G शिवाय व्यवहार चालत नाहीत संगणक च बंद असल्याने अनेक ग्राहक रुपये देण्या घेण्यासाठी दररोज चकरा मारीत आहेत या कारभारात त्वरित सुधारणा होणे गरजेचं आहे
दरम्यान BSNL खात्याशी संपर्क झाला नसला तरी इंटरनेट पुरवणारी केबल चोरीला गेल्याची माहिती पण समोर आली आहे
अडचण काही असो
जागतिक टपाल दिनी येथील सर्वच व्यवहार खोळंबले हे मात्र सत्य आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close