मतदार संघाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार –

संपादक :- अकबर सिद्दीकी
संतोष मुरकुटे पालममा :- मागीलअनेक वर्षापासून गंगाखेड मतदारसंघात विविध कामे हात मदतीच्या माध्यमातून सुरू असून असेच काम पुढील काळातही करणार असल्याचे प्रतिपादन मुरकुटे मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी दि. 6 रोजी दिवाळीनिमित्त शहरातील व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी दरम्यान बोलताना व्यक्त केले यावेळी नंदकिशोर बोलोरे. रुपेश शिनगारे. माऊली घोरपडे आनंद साखला आदी कार्यकर्ते उपस्थित होते
या दरम्यान शहरातील दिवाळीनिमित्त अनेक व्यापाऱ्याच्या प्रतिष्ठानास भेटी देऊन दिपवाळीच्या शुभेच्छा देत गंगाखेड मतदार संघात हात मदतीच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय महामार्गावरील पडलेले मोठमोठे खड्डे त्यांनी बुजवत वाहनधारकांना दिलासा दिल्याने ते सर्वत्र चर्चेत आले होते यासह तालुक्यातील सेलू येथील जाणारा रस्ता अत्यंत खराब झाल्याने हा रस्ता स्वखर्चातून करून दिल्याने मुरकुटे यांची सामाजिक बांधिलकी जोपासून गंगाखेड मतदार संघात नेहमीच काम करण्याची पद्धती मुळे चर्चेत आले आहेत यामुळे भविष्यातही असे काम माझ्या माध्यमातून करीत असल्याचेही त्यांनी सांगितले