Breaking News

शिंदे यांच्या प्रयत्नामुळे चार कोटी रुपयाच्या कामास मिळाली मंजुरी

 

संपादक :- अकबर सिद्दीकी

पालम :- तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या जांभूळ बेटकडे जाणाऱ्या रस्त्यासह या ठिकाणी असलेल्या नदीवर कमी उंचीच्या पुलासाठी रत्नाकर शिंदे यांनी केलेल्या पाठ पुरवठ्यामुळे चार कोटी रुपये च्या कामास मंजुरी नुकतीच प्राप्त झाली असल्याची माहिती शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे

शहरापासून जवळच असलेल्या निसर्गाच्या जांभुळबेट हे पर्यटन स्थळ पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यातील पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात परंतु येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने पावसाळ्यात या ठिकाणी कमी उंचीच्या पुलामुळे हा मार्ग सातत्याने बंद पडला जातो या प्रकाराकडे स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासकीय अधिकार्‍याकडे पाठपुरावा करूनही याचा फारसा परिणाम न झाल्याने पंचायत समितीचे मा. सभापती रत्नाकर शिंदे यांनी माजी मंत्री फौजिया खान यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यांनी लगेच राज्याच्या पर्यटन मंत्री आदिती तटकरे यांनी या रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी रुपये. लेंडी नदीच्या पुलासाठी दोन कोटी रुपये असे चार कोटींचा कामासाठी तत्वतः मान्यता प्राप्त झाली असल्याची माहितीही त्यांनी देण्यात आली आहे यामुळे या भागातील 10 गावाचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close