Breaking News

खड्ड्याने घेतला जवानांचा बळी,खड्ड्यात गाडी आदळल्याने रायफलमधून अचानक गोळी झाडल्याने जवानांचा मूर्त्यु

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

               संपादक :- अकबर सिद्दीकी

            हिंगोली :- येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्पमध्ये कार्यरत असलेल्या एका जवानाचा अपघातात छातीत गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 22 नोव्हेंबर सोमवारी पहाटे घडली. त्यांच्या फोर्सच्या मधील डॉक्टरला आणण्यासाठी नांदेडला जात असताना खड्ड्यामध्ये गाडी आदळल्याने रायफलमधून अचानक गोळी झाडल्या गेली ती थेट छातीत लागल्याने जवान पप्पाला भानूप्रसाद यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्पमध्ये कार्यरत असलेले जवान कॉन्स्टेबल पप्पाला भानूप्रसाद वय 35 वर्षे ,रा. आंध्र प्रदेश ) हे कर्तव्यावर होते. पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास ते दलाच्या गाडीमध्ये हैदराबादवरून नांदेडला आलेल्या डॉक्टरला घेण्यासाठी जात होते. दरम्यान, हिंगोली ते नांदेड या रस्त्याचे काम सुरु असल्याने मोठे खड्डे पडले आहेत. डोंगरकडापासून तीन किलोमीटरवर गाडी आली असता रस्त्यावरील एका खड्डयात गाडी आदळली. यावेळी जवान पप्पाला भानुप्रसाद यांच्या रायफलमधून अचानक गोळी सुटली ती थेट जवान छातीत घुसल्याने जवान पप्पाला गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. माहिती मिळताच ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड, पोलीस उपनिरीक्षक बालाजी पुंड यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशस्त्र सीमा बलाचे कमांडंट तिवारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलनाहीच

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close