प्रज्ञाताई सातव विधान परिषदेवर बिनविरोध निवड, भाजपचे केणेकरांची माघार

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :-हिंगोली जिल्ह्यातील कॉंग्रेस नेत्या प्रज्ञाताई सातव विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञाताई सातव यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे भाजप उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना विनंती केल्यानंतर अखेर भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे सूत्रांची माहिती. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर विधान परिषदेची पोट निवडणूक होती. दरम्यान काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचे निधन झाला त्यामुळे रणपिसे यांचे निधनाचे रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञाताई सातव यांची वर्णी लागली. प्रज्ञाताई सातव या महा विकास आघाडीचे उमेदवार आहेत राजू सातव काँग्रेसचे युवा नेते होते त्यांच्या सर्वांशी जवळचा परिचय होता त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न करणार असल्याचे नाना पटोले म्हणाले होते.
त्यानुसार त्यांनी आणि बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भाजप उमेदवार संजय केनेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सहमती दर्शवली. राज्यसभेचे खासदार राहिलेले राज्यसत्ता यांचा निधन झालं त्यांचे निधनानंतर त्यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना सक्रिय राजकारणात उतरविण्याची काँग्रेसने भूमिका घेतली होती. राजू सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांना या जागी संधी दिली पाहिजे असे पक्षातील नेत्यांचे महणणे होते. राजू सातव यांनी पक्षासाठी दिलेले योगदान लक्षात घेता त्यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेसाठी संधी द्यावी असे अनेकांची इच्छा होती. प्रज्ञाताई सातव यांनी संधी मिळाली आणि बिनविरोध निवडून आले.
जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना
आता प्रज्ञाताई सातव यांच्या विधानपरिषद वरील निवडीने पुन्हा नवा हुरूप असल्याचे पहायला मिळत आहे.व पूर्ण जिल्हाभरात कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त केले जात आहे.