मुख्याध्यापक के.सी घुगे,मानव विकास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित*

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पांगरी, येथील प्रयोगशील व ऊपक्रमशील मुख्याध्यापक के.सी.घुगे यांना 21 नोव्हेंबर रोजी,लातूर येथे पद्मश्री डॉक्टर तातेराव लहाने,पोपटराव पवार यांचे शुभ हस्ते,पदमश्री शब्बीर मामू,राज्यमंत्री संजय बनसोडे,शिक्षक आमदार विक्रम काळे प्रसिद्ध साहित्यिक इंद्रजीत भालेराव,डॉ.रागिणी पारेख,वसंत घोगरे यांचे उपस्थितीत राज्यस्तरीय मानवविकास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, लोकसहभागातून शाळा डिजिटल व ई लर्निंग करून ,शाळेत विविध भौतिक सुविधा,शाळा व्यस्थापन समिती,गावकरी व सहकाऱ्याच्या मदतीने निर्माण केल्या आहेत,विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी,वर्षेभर विविध उपक्रम राबवविले जातात.गेल्या 6 वर्षांपासून शाळेचा पट वाढत आहे.कोरोना काळातही मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व मुले शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी विविध उपक्रम राबविले.यापूर्वीही त्यांना स्व. सुंदरलाल सावजी पुरस्कार,आमदार उपक्रमशील शिक्षक पुरस्कार,कै.जय कुमार जैन उपक्रमशील शिक्षक पुरस्कार, जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाने गौरव पत्र देऊन गौरविले आहे, ह्या पुरस्करामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.