Breaking News

भा ज पा सर्व समाजाला न्याय देऊ शकत नसल्यामुळे प्रताप देशमुख यांची पक्षाला सोड चिट्टी

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

                     संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतुर :- भारतीय जनता पक्षाच्या जिंतूर मंडळ अध्यक्ष आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रताप विनायकराव देशमुख यांनी जिल्हाध्यक्ष यांच्याकडे ई मेलद्वारे पाठविला आहे                  मागील दोन वर्षांपासून मी भारतीय जनता पार्टी तालुका जिंतूर प्राथमिक सदस्य व मंडळ अध्यक्ष असुन सदस्य झाल्यापासून माझी विचारसरणी व पक्षाची विचारसरणी जुळत नाही.
मी एक धर्मनिरपेक्ष कुटुंबातुन पुढे आलेलो व्यक्ती आहे.भाजपा पक्ष हा ओ.बी.सी., मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाला न्याय देऊ शकत नाही अशी माझी धारणा झाली आहे व तसेच अनुभव या दोन वर्षात मिळाले आहेत.त्यामुळे पक्षात माझ्या मनाची घुसमट होत आहे.
करिता आज मी भाजपा पक्षाचा प्राथमिक सदस्य व जिंतूर तालुका मंडळ अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.माझा राजीनामा जिल्हाध्यक्ष यांनी स्वीकार करावा या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून जिंतूर शहरात हा चर्चेचा विषय असून भविष्यामध्ये प्रताप देशमुख कोणत्या पक्षात जाणार हे अद्यापि स्पष्ट झाले नसल्याने या विषयी उलट सुलट चर्चा होत  आहे
टिप:-या पुढे कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश घ्यायचे हे जिंतूर शहर व तालुक्यातील माझे सर्व कार्यकर्त्यांची येत्या दोन तीन दिवसांत बैठक घेऊन कार्यकर्त्यांचे विचार व चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे जसमर्थकशी बाेलतांना सांगितले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close