Breaking News

जिंतूर प्रेस क्लबचे जिल्हास्तरीय दर्पण पुरस्कार जाहीर सामाजिक वार्ता सुरेश जंपनगिरे तर विकास वार्ता पुरस्कार विठ्ठल भिसे यांना जाहीर

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

                 

      संपादक :- अकबर सिद्दिकी

जिंतूर:- जिंतूर तालुका प्रेस क्लबच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारे दर्पण पुरस्कार जाहीर करण्यात आले असून सामाजिक वार्ता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुरेश जंपनगिरे तर विकास वार्ता पुरस्कार पाथरीचे ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल भिसे यांना जाहीर करण्यात आला असून 7 जानेवारी रोजी एका भव्य कार्यक्रमात पद्मश्री राहीबाई पोपेरे व साहित्यिक संदीप काळे आदीं मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे
जिंतूर तालुका प्रेस क्लबच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी जिंतूर करांसाठी साहित्यिक मेजवानी चे आयोजन केले जाते याहीवर्षी 7 जानेवारी 2022रोजी सायंकाळी सहा वाजता जुनी मुन्सबी, भाजी मंडी जिंतूर या ठिकाणी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमासाठी नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या व ज्यांनी जातिवंत बियाणाची 54 पिकाची 116 वाणाची बीजबँक तयार केली अशा बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राहणार असून त्यांच्यासोबत परंपरागत व नैसर्गिक येणाऱ्या पालेभाज्या रानभाज्या सेंद्रिय पद्धतीने पिकवणाऱ्या अन्नमाता ममताबाई भांगरे यांची ही उपस्थिती राहणार आहे या बीजमाता वअन्नमाता यांची प्रकट मुलाखत मुंबईचे साहित्यिक ,संपादक,निवेदक ,संघटक व व्हॉइस ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे हे घेणार आहे
दरवर्षी तालुका प्रेस क्लबच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या व निर्भीडपणे लिखाण करणाऱ्या दोन पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर सामाजिक वार्ता दर्पण पुरस्कार व आचार्य बाळशास्त्री जांभेकर विकास वार्ता दर्पण पुरस्कार देण्यात येतो यापूर्वी अभिमन्यू कांबळे, संतोष धारासूरकर ,राजाभाऊ नगरकर ,सुरज कदम ,यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे यावर्षी सामाजिक वार्ता पुरस्कार सुरेश जपंनगीरे यांना तर विकास वार्ता पुरस्कार विठ्ठल भिसे यांना जाहीर करण्यात आला आहे हे दोन्ही पुरस्कार याच कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे पुरस्काराचे स्वरूप रोख प्रत्येकी पाच हजार रुपये सन्मानचिन्ह ,जांभेकर पगडी ,पुष्पहार शाल असे आहे
जिंतूर शहरांमध्ये प्रथमच कृषीवर आधारित कार्यक्रम होत असल्याने प्रगतशील शेतकरी सेंद्रीय शेती करणारे व आपल्या शेतामध्ये नावीन्यपूर्ण वाणाचा उपयोग करून नवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा कार्यक्रम एक मेजवानी ठरणार आहे या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिंतूर तालुका प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आले आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close