डोळ्यात स्प्रे मारून पाच लाख रुपय भर रस्त्यात चोराने केले लंपास, पोलिसांच्या पाठलंगा केल्या मुळे पवनेदोन लाख मिळाले

संपादक :- अकबर सिद्दिकी
सेलु :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डासाळा येथील शाखेची सुमारे ५ लाख रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांच्या डोळल्यात स्प्रे मारून अज्ञात चोरट्यांनी मंगळवार, दि.०४ रोजी सकाळी धुम सिनेस्टाईल पध्दतीने चोरी करत लंपास केली.परंतु पोलिसांनी चोराचा पाठलंगा केल्या ने चोराने रस्त्यावर पवणे दोन लाख रुपये रोकड फेकून पळून जाण्यास यशस्वी झाले
सेलू तालुक्यातील डासाळा शाखेचे शाखाधिकारी केशव मांडे व रोखपाल बालासाहेब जाधव हे दोघे सेलूतून मंगळवारी सकाळी रोख रक्कम घेवून निघाले. तेंव्हा देऊळगाव पाटीजवळ विना क्रमांकाच्या दोघा मोटारसायकलस्वारांनी या दोघा कर्मचा-यांच्या डोळ्यात स्प्रे मारला अन ५ लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी गायब केली. परंतु, कर्मचा-यांनी तात्काळ तो प्रकार सेलू पोलिसांना कळविल्याने पाठोपाठ पोलिस उपनिरीक्षक साईनाथ अनमोड, उमेश बारहाते, आप्पा वराडे व शेख गौस यांनी या चोरट्यांचा पाठलाग करीत मानवत तालुक्यातील रुढी पाटीजवळ चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला तेंव्हा चोरट्यांनी त्या रकमेतील पावणे दोन लाख रुपये रस्त्यावर फेकून पोबारा केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरुच ठेवला. परंतु, ते पुढे पसार झाले. दरम्यान, या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत असून पैसे चोरण्याची हि पाचवी घटना असल्याचे समजते