Breaking News

जिंतूरात दर्पण दिनानिमित्त गरजूंना ब्लॅंकेटचे वाटप * तालुका मराठी पत्रकार संघाचा अनोखा उपक्रम * ज्येष्ठ पत्रकार बांधवांच्या कार्याचा गौरव

                संपादक:-अकबर सिद्दिकी
जिंतूर :-  जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून शहरातील पत्रकार भवनमध्ये गुरुवार 06 जानेवारी रोजी कडाक्याच्या थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी गरजूंना उच्च प्रतीचे ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमात तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार बांधवांना सन्मान चिन्ह, डायरी, पेन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा कार्याचा गौरव करण्यात आला.
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे आद्यप्रवर्तक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त निमित्त तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शहरातील पत्रकार भवनात दर्पण दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार एम. ए. माजीद यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक दीपक शिंदे, कृ.ऊ.बा. समितीचे मुख्य प्रशासक मनोज थिटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर, प्रतिष्ठित व्यापारी सत्यनारायण शर्मा, डॉ देवराव कऱ्हाळे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावं या उदात्त हेतूने शहर व परिसरातील गरजूंना पत्रकार संघाच्या वतीने उच्च प्रतीचे ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. सोबतच मागील अनेक वर्षांपासून अन्यायाला वाचा फोडणारे व समाज हितासाठी संघर्ष करून वेळप्रसंगी प्रशासनाला जागं करण्यासाठी लेखणीची धार तीव्र करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार बांधवांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष शहेजाद खान यांनी केले. सूत्रसंचालन मो.या. शेख यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष गुनिरत्न वाकोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामप्रसाद कंठाळे, शेख वाजीद, शेख शकील, रफिक तांबोळी, रियाज चाऊस, शेख सिराजुद्दीन, एम एजाज, शेख अलीम, सिराज सिद्दीकी, शेख रहीम, बाबा राज, शेख इफ्तेखार, सय्यद नसीर आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close