पंतप्रधान मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी आमदार मेघना बोर्डीकर मंदिरात
संपादक :- अकबर सिद्दिकी
जिंतूर :- जिंतूर येथे आमदार मेघना बोर्डीकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घ आयुष्यासाठी येथील सिद्धेश्वर मंदिरात भगवान शंकरच्या पिंडवर महाभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षा मध्ये झालेल्या चुकांमुळे पंतप्रधान यांच्या जीवाला धोका झाला असल्याच्या समोर आले आहे त्याकरिता जिंतूर सेलू विधानसभेचे भाजपाचे आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळी जिंतूर येथील नगरेश्वर मंदिर येथे पंतप्रधान यांच्या गिर दीर्घ आयुष्यासाठी भगवान शंकरच्या पिंडवर अभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप केला यावेळी माजी नगराध्यक्ष मुन्ना गोरे, बीजेपी तालुका अध्यक्ष कटारे,डॉ.पंडित दराडे ,ऍड, गोपाळ रोकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते