Breaking News

मॉल, थेटर,बाजार पेट चालू, लग्नात पॉलिटिक्स कार्यक्रमा मध्ये लोकांची गर्दी या सर्वांना परवानगी मग शाळाच का बंद ? कृपा चौधरी यांचा स्थानिक प्रशासनाला सवाल ?

संपादक :- अकबर सिद्दिकी
जिंतूर :- स्थानिक प्रशासनाने शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान केले कोरोना संसर्ग हा गेल्या दोन वर्षापासून आहे आणि येत्या तीस वर्षात सुरू राहील त्यामुळे का तीस वर्ष शाळा बंद राहणार आहे का? कोरोना आजारा बरोबर जगायला आपल्याला शिकवा लागेल सध्या परभणी जिल्ह्यात मॉल थेटर पॉलिटिक्स कार्यक्रम, लग्न सभारंभ,दारूच्या दुकानात, बाजारपेठ यात लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे त्यावर स्थानिक प्रशासनाने निर्बंध न घालता फक्त शाळाच कोणत्या निकषावर बंद केल्या परभणी जिल्ह्यात विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारे कोरोना ची बाधा झाल्या चे दिसून येत नाही आणि प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी सुद्धा लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेले आहे मग स्थानिक प्रशासनाने शिक्षक संस्थांना विश्वासात न घेता अचानक शाळा बंद चे ऑर्डर काढून शाळा बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे असा प्रश्न उपस्थित करू जिंतूर येथील नियु इरा इंग्लिश सकूल चे अध्यक्षा चौधरी कृपा मैडम यांनी स्थानिक प्रशासनाने विरुद्ध आपली नाराजी व्यक्त केली
शहरातील न्यू इरा इंग्लिश स्कुलमध्ये शनिवार 8 जानेवारी रोजी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेत मेस्टा महिला प्रदेश उपाध्यक्षा अंजली बाबर, मेस्टा शहराध्यक्षा प्रिया ठाकूर, मेस्टा जिल्हाध्यक्षा सरोज देसरडा, शशी अय्यर, न्यू इरा इंग्लिश स्कूल अध्यक्षा कृपा चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयावर पुढे बोलतांना चौधरी म्हणाल्या की, ज्या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक तसेच इतर शालेय कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आले नाहीत अशा ठिकाणच्या शाळा बंद ठेवणे चुकीचे आहे. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. याचा प्रशासनाने खूप गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. शाळा बंद करण्याच्या निर्णया अगोदर पालकांच्या मतांचे सर्वेक्षण करून शासनाने योग्य ते निर्णय घ्यावेत.
ग्रामीण भागातील मुलांना ऑनलाइन क्लासेस सुरळीत चालू राहण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. सतत उद्भवत असलेले नेटवर्क समस्या मोबाईलची कमतरता यामुळे नियमित ऑनलाईन क्लास करणे शक्य होत नाही. शिक्षण हा एक मूलभूत अधिकार आहे आणि तो प्रत्येकाला कोणत्याही परिस्थितीत मिळवून देणे ही स्थानिक आणि
राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे. संपूर्ण शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे १००% लसीकरण झाले आहे. ज्या शाळेत कोरोना संक्रमित विद्यार्थी व शिक्षक आढळून आल्यास केवळ तीच शाळा काही ठराविक कालावधीसाठी बंद ठेवण्यात यावी.
शासनाच्या शाळा बंद धोरणामुळे पुढील पिढीच्या हातात डिग्री चे कागद असतील ज्यांना जगाच्या व समाजाच्या बाजारात कवडीचीही किंमत असणार नाही. शाळा बंद करण्याला आमचा विरोध नाही कारण शाळेतील संक्रमित मुलांचे प्रमाण शाळेत जाणाऱ्या आणि शाळेतून कोरोना बाधित होऊन अॅडमिट होणाऱ्या मुलांचे प्रमाण ०.०००१ इतकेही नाही. शिक्षकांचे संक्रमित होण्याचे प्रमाण ०.०००१ इतकेही नाही. म्हणून जिल्हाधिकारी यांनी आपल्या निर्णयावर फेरविचार करून परिस्थितीचे सर्वेक्षण करून पुढील तीन दिवसात शाळा पूर्ववत सुरू कराव्यात असे सांगितले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close