Breaking News

जिंतूरात पण पोलावार खून प्रकरणाचा निषेध -कडक शासन करा निवेदना द्वारे मागणी

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दिकी

जिंतूर
मनूर ता. उमरी जि नांदेड येथील ज्येष्ठ नागरिक स्व. धोंडीबा शंकरराव पोलावार यांच्या मारेकऱ्यांना आणि चौकशी अधिकाऱ्यास कडक शासन करण्यात यावे असे निवेदन आज जिंतूर तहसीलदार यांना आर्य वैश्य समाज जिंतूर च्या वतीने देण्यात आले.
उमरी तालुक्यातील मनूर येथील आर्य वैश्य समाजातील ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक धोंडीबा शंकरराव पोलावार ७० वर्ष यांचा स्वस्त धान्य बाबत तक्रार केल्याचा मनात राग धरून भर दिवसा खून करण्यात आला या गंभीर घटनेचा जिंतूर च्या आर्य वैश्य समाजा कडून तीव्र निषेध करण्यात आला या प्रकरणी आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
दि ५जून रोजी च्या या खून प्रकरणातील आरोपीवर कठोर कार्यवाही करावी तसेच स्वस्तधान्य दुकानदार यास मदत करत आसलेल्या चौकशी अधिकारी ,तलाठी यांच्या वर पण कार्यवाही करावी कारण चौकशी अधिकारी यांनी कोणताही पोलीस बंदोबस्त न घेता धान्य दुकानदार च्या मुलाला मदत करीत त्याच ठिकाणी त्यास बसू दिले म्हणूच हा गंभीर प्रकार घडला आहे वरील प्रकरणाचा आम्ही आर्य वैश्य समाज बांधव तीव्र निषेध करीत आहोतअसे निवेदनात नमूद केले आहे निवेदनदेताना आर्य वैश्य समाज अध्यक्ष सखाराम चिद्रवार,
नगरेश्वर मन्दिर अध्यक्ष किरण वट्टमवार राज्य संघटन प्रमुख प्रदिप कोकडवार चंद्रकांत येरमवार, दीपक वट्टमवार महासभेचे जिल्हा सहसचिव सुनील वट्टमवार,लक्ष्मीकांत कवठेकर,रुपेश चिद्रवार संतोष वट्टमवार दत्तात्रय लाटकर लक्ष्मीकांत चिद्रवार उपस्थित होते

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close