Breaking News

आ.मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मौ.बलसा येथे दाहा लक्ष रुपये चे विकास कामाचे भूमिपूजन

संपादक :- अकबर सिद्दिकी
जिंतूर :- जिंतूर-सेलू चे लोकप्रिय आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिनांक 11 जानेवारी रोजी तालुक्यातील मौ.बलसा येथे आपल्या विकास निधी अंतर्गत दाहा लक्ष रुपये चे सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन केले या वेळी मंचावर भाजपा नेते राजेंद्रजी थिटे, श्रीसंत भगवानबाबा युवक संघटनेचे संथापक अध्यक्ष तथा भाजपा नेते लक्ष्मणराव बुधवंत, सुयोगजी मुंडे, रामेशजी सडाळ, सरपंच, उपसरपंच व गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मतदारसंघातील ग्रामीण भागाचा विकास हुवावे म्हणून मौ.बलसा येथे आपल्या विकास निधी अंतर्गत दाहा लक्ष रुपये निधि देऊन गावातील सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचे चे भूमीपूजन केले
यावेळी आ.बोर्डीकर यांनी आपला मनोगत व्यक्त करताना म्हणाले की माझे बलसा गावावर विशेष लक्ष आहे मी भविष्यात ही या गावासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. त्याचबरोबर ग्रामपंचायत मधील पदाधिकाऱ्यांनी गावातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा करून विकासाच्या कामांवर भर द्यावा असे सांगतानाच ग्रामपंचायत च्या कामाचे कौतुक देखील आमदार बोर्डीकर यांनी केले या वेळी वृक्षारोपण हि आ. बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण इलग, रामप्रसाद शिंदे, अंकुश डोंबे, आश्रोबा इलग, दिलीप अंभोरे, राजेंद्र डोंबे, रावसाहेब इलग आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close