मूळ जिंतूर रहिवासी सूंदर कोकडवार यांचं पुण्यात अपघाती निधन

संपादक :- अकबर सिद्दिकी
जिंतूर
मूळ जिंतूर रहिवासी सूंदर राघोबा कोकडवार यांचं पुण्यात अपघात झाल्याने रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले
जिंतूर शहरातून मुलांच्या नोकरी व व्यवसाय निमित्ताने पुण्यात स्थायिक झालेले व्यापारी सूंदर राघोबा कोकडवार ७२ हे नेहमी प्रमाणे वारजे नाका जवळील आपल्या दुकानावर जाण्यासाठी शिवने येथील निवासस्थानातून सोमवारी दि१०रोजी दुपारी ५वाजता निघाले पण रस्ता ओलांडताना ऑटोरिक्षा ने जोरदार धडक दिली त्याच वेळी गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारा दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मंगळवार दि ११ रोजी त्यांचे दुःख निधन झाले पूर्वी ते जिंतूर येथील वरुड रोडवरील नृसिह चौकात त्यांचे दाल फ्राय स्पेशल हॉटेल चालवत तेव्हा पासून ते प्रसिद्ध होते त्यांच्या अकाल अपघाती मृत्यू मुळे हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंड भाऊ असा मोठा परिवार आहे नवी पेठेतील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले
जिंतूर येथील व्यपारी यांची प्रतिक्रिया
कै. सुंदर राघोबा कोकडवार.जिंतूर येथील आणि मराठवाड्यातील सुप्रसिद्ध दालफ्राय चे जनक आणि दाल फ्राय च्या पेटंटचे हक्कदार अन्नपूर्णा भोजनालय.त्या काळात त्यांनी फक्त दहा रुपयात जेवण दीले जिंतूर शहरातील लोकांना आणि बाहेर गावच्या प्रवाशांना दाल फ्राय चे अक्षरशहा वेड लावले आणि आमच्या सारख्या व्यवसायिकांना दाल फ्राय च्या व्यवसायामध्ये अनेक रेस्टॉरंट् व्यवसायिकांना लाखो रुपये कमावण्याची संधी मिळाली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली ओम रायत्रिवार सप्तगिरी रेस्टॉरंट जिंतूर