Breaking News

*जिंतूरात जिजाऊ जयंती निमित्त दीपोत्सव, “जिजाऊ ब्रिगेडचा उपक्रम,

संपादक :- अकबर सिद्दिकी

जिंतूर :- शहरातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी स्वराज्य जननी माँ साहेब जिजाऊ यांची जयंती 12 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात लक्ष दिवे लावून साजरी करण्यात आली यावेळी लावण्यात आलेल्या दिव्यामुळे पुतळा परिसर उजळून निघाला होता.

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती जगभरात 12 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते याचेच औचित्य साधून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा संकटामूळे उत्सवावर बंधने आली त्यामुळे मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाचे नियम पाळून जयंती साजरी करावी असे आवाहन करण्यात आले होते म्हणून शहरातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात जिजाऊ जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुतळा परिसरात लक्ष दिवे लावण्यात आले यामुळे पुतळा परिसर दिव्यांचा प्रकाशामुळे उजळून निघाला होता यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा रंजना भोंबे, शालिनीताई देशमुख,प्रतिभा साबळे,मिना भोंबे,नमिता सोळंके,मेघा मस्के,उषा चव्हाण,शिवनंदा शिंदे,मीरा देशमुख,शितल थिटे,जानकी कदम,अश्विनी मेटांगळे यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या महिला उपस्थित होत्या

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close