Breaking News

अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे उपोषण

संपादक :- अकबर सिद्दिकी

        जिंतूर (जनसमर्थक) :- जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अतिक्रमण हटवण्याचा मागणीसाठी पूर्वी सुचना देऊन सुध्दा अतिक्रमण हटविण्यात आले नसल्याने संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर दिनांक 14 जानेवारी पासून उपोषणास सुरुवात केली आहे

जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे यामुळे पुतळा परिसरात नेहमी वाहतुकीची कोंडी निर्माण होते तर हातगाडी व पानपट्टी मूळे घाणीचे प्रमाणात वाढ झाली आहे मुळे पुतळ्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे यामुळे संभाजी ब्रिगेडने वेळो वेळी सा बा विभाग व नगरपरिषदने दुर्लक्ष केले होते म्हणून संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष माजी सैनिक बालाजी शिंदे व बाळासाहेब काजळे यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरवात केली असून जो पर्यंत अतिक्रमण हटणार नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्ते यांनी सांगितले आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close