Breaking News

*भाजप हाच कॉंग्रेसचा राजकीय शत्रु-कॉंग्रेस प्रदेश सचिव सुरेश नागरे,, “कॉंग्रेसला धर्मनिरेपक्ष विचारधारेची ओळख,,

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दिकी

जिंतुरभाजप हाच कॉंग्रेसचा एकमेव राजकीय शत्रु असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रदेश सचिव सूरेश नागरे यांनी दिली.भाजप पक्ष्याची विचार सरणी व कॉंग्रेस पक्ष्याची विचार सरणी ही विभन्न असुन आज पर्यत फक्त देशात कॉंग्रेस पक्षानेच भाजपची राजकीय कारकीर्द असो किंवा भाजपने एकतर्फी घेतलेल्या निर्णयास वेळोवेळी प्रखर विरोध केला.ज्यात शेतकरी विरोधी बिल,सी.ए.ए.व एन.आर.सी तसेच खाजगीकरन,अचानक केलेली नोटबंदी,व लादलेले लॉकडावून असेल अश्या अंसख्य जनप्रक्षोपास कारणीभूत असलेल्या निर्णयास देशात फक्त कॉंग्रेस पक्ष्याने कड़ाडुन रस्त्यावरच नाही तर लोकसभा,राज्यसभा,विधानसभा,विधानपरिषद असेल आदि ठिकाणी विरोध केला व या पुढेही ज्या-ज्या वेळी भाजप “मन की बात”चे तुनतुने ऐकवत देशाच्या नागरिकांच्या भावनेचा विचार न करता म्हणजेच देशविरोधी निर्णय घेईल त्या-त्या वेळी फक्त आणि फक्त देशातील हाच एकमेव कॉंग्रेस पक्षच कडाडुन विरोध करेल.असे सुरेश नागरे यांनी सागुन आपल्या लोकशाही देशात सर्व जातिधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.जगात भारताची ओळख धर्मनिरेपक्ष राष्ट्र म्हणून ओळख आहे.वास्तविक पाहता सत्तेत येणाऱ्या राजकीय पक्ष्याने सर्व जातिधर्माना सोबत घेवून विकास कामाचे विकेंद्रीकरण केले पाहिजे.पण आज केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप पक्षा द्वारे असे होत नाही.सद्या देशात धर्मनिरेपक्षता पाळली जात नाही.सध्या धर्म पुढे करत या पक्ष्याची वाटचाल सूरु आहे.या अश्या प्रवृती मुळे देशाचा विकास खूंटला आहे.अशी टिकाही सुरेश नागरे यांनी केली आहे.देशात फक्त कॉंग्रेस हाच विचारधारा असलेला एकमेव धर्मनिरेपक्ष पक्ष म्हणून ओळख जपुन आपली राजकीय वाटचाल पक्ष स्थापन झालेल्या 28 डिसेम्बर 1885 पासुनच सर्व जातिधर्मास सोबत घेवून करतो.

 * हे हि वाचा *
देशासह राज्यात भाजपला गळती

सध्या देशात भाजपाला गळती लागलेले चित्र दिसून येत आहे.देशातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेश मध्ये मंत्र्यांसह आमदारांनी राजीनामे दिले आहेत.या राजीनाम्यात अतिमागास,दलित नेत्रत्वास जास्त सहभाग दिसून येतो.याच बरोबर परभणी जिल्ह्यातील भाजपचे एकनिष्ठ विजय गव्हाणे यांनी भाजपला सोडचिठी दिली.जिंतुर भाजपचे ता. अध्यक्ष माजी नगरसेवक प्रताप देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला असुन ते आमच्या कॉंग्रेस सोबत आहेत.यांच्या पक्ष प्रवेशा मुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत कॉंग्रेस पक्षास बळकटी भेटणार असुन सध्या आमचा प्रमुख विरोधी पक्ष असणारा भाजपला कॉंग्रेसची भिती वाटत असल्याने आमच्या बद्दल झारीतील शुक्राचार्य कॉंग्रेस ही “भाजपची बी टीम” असा अपप्रचार करत असुन पक्ष प्रमुख सोनिया गांधी,राजीव गांधी यांनी दिलेल्या हिरव्या झंडी मुळे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी कानमंत्र देत आदेश दिलेले असल्या मुळे राज्यात कॉंग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्या स्वय ताकदीवर निवडणूक लढवनार असल्याची माहिती कॉंग्रेस प्रदेश सचिव सुरेश नागरे यांनी प्रसिद्धि पत्रकात माहिती दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close