Breaking News

वरुड नृ. येथील सरपंच ग्रामसेवक यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- तालुक्यातील वरुड नृ. येथील विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेले असून दलित वस्ती, समशान भूमी, सार्वजनिक समशान भूमी, अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत, जिल्हा परिषद शाळेमधील किचन हॉल, मागासवर्गीय वस्ती मधील शौचालयाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे या सर्व कामांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी सरपंच, ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे रंगनाथ काशिनाथ काळदाते यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिनांक 18 जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की 14 व्या वित्त आयोग निधी मधून वरुड येथे दलित वस्ती, समशान भूमी, सार्वजनिक समशान भूमी, अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत, जिल्हा परिषद शाळेमधील किचन हॉल, मागासवर्गीय वस्ती मधील शौचालयाचे बांधकाम झालेले असून हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे मातीमिश्रित वाळू व क्रेशर च्या डस्ट चा या बांधकामा मध्ये मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आलेला आहे तसेच तीर्थक्षेत्र विकास निधी मधून 2019/ 2020 मध्ये सि सी रोड तयार करण्यात आला तो रोड पूर्वी अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरच केला असून सहा महिन्यांमध्ये नवीन केलेला रस्ता वाहून गेला.रेती उत्खनन बंद असताना नदी, नाल्याची मातीमिश्रित वाळू मध्ये सिमेंट वापरून थातूरमातूर कामे करून निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवण्यात आला दलित वस्ती सुधार योजनेतून खर्च झालेल्या रस्त्यावर सीसी रोड व नाली वर डागडुजी करून बिले उचलण्यात आली गावठाण जमिनीवर 25 ते 30 वर्षा पासून जे ग्रामस्थ राहतात त्यांचा नमुना नंबर आठ देण्यासाठी ग्रामसेवकाकडून जास्तीची रक्कम आकारली जात असून ही रक्कम ग्रामपंचायत च्या खात्यावर जमा न करता ती ग्रामसेवकाच्या खिशात जमा होत आहे. मासिक सभा,ग्रामसभा या प्रत्यक्ष होत नसून कागदोपत्री होत आहे 15 व्या वित्त आयोगातून जी कामे होत आहेत ती अतिशय निकृष्ट दर्जाचे असून वाटर सप्लाय ची दुरुस्ती व पाईपलाईन जुनी दाखवण्यात आली आहे लाईट हायमास्ट दिव्या मध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून ग्रामसेवक बी आर देशमुख यांच्याकडे चार ते पाच ग्रामपंचायतीचा कारभार असून त्यांना सरपंचाची साथ आहे ग्रामसभा न घेताच घरकुल,नरेगा मधून विहीर व फळबाग योजनेचे लाभार्थी निवडले जातात या सर्व बाबींची उच्चस्तरीय चौकशी करून सरपंच ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close