व्हॉइस ऑफ मिडीया च्या मराठवाडा अध्यक्षपदी विजय चोरडिया

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :-पत्रकारांच्या मूलभूत सोयी सुविधा साठी देश पातळीवर काम करणाऱ्या “व्हाईस ऑफ मीडिया “या संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष पदावर ज्येष्ठ पत्रकार विजय चोरडिया यांची निवड करण्यात आली आहे
त्यांच्या निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी त्यांना दिले आहे
विजय चोरडिया हे मागील सव्वीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करतात आहे तळागाळातील पत्रकारांच्या नेमक्या समस्या कोणत्या ,ग्रामीण पत्रकारांच्या अडचणी, कोणत्या व नवोदित पत्रकारांना कशा पद्धतीने पत्रकारिता करावयास पाहिजे यासंदर्भात सखोल अनुभव त्यांना असल्याने यांची मराठवाडा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे
व्हॉइसऑफ मीडिया या देशपातळीवर काम करणाऱ्या संघटनेत वेगवेगळ्या चॅनल चे संपादक राष्ट्रीय पातळीवरच्या वर्तमानपत्राचे संपादक कार्यरत असून केंद्र व राज्य सरकारच्या सहाय्याने पत्रकारांच्या हितासाठी व विकासासाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करण्यासाठी व्हॉइसऑफ मीडियाची टीम काम करीत आहे लोकशाहीचा महत्वपूर्ण कणा असलेल्या पत्रकारितेला नवा आयाम देण्यासाठी, पत्रकारांचे प्राथमिक प्रश्न सोडविण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मिडिया’ ही संघटना देशपातळीवर काम करते. गेल्या तीन वर्षांपासून, पत्रकारांच्या मूळ विषयांवर रिसर्च करीत, जेष्ठ पत्रकारांची फळी एकत्रित आली आणि त्यांनी पत्रकारांच्या पाच मूळ विषयांवर काम करण्याचा निर्णय घेतला. मराठवाड्यात सुद्धा त्या पाच विषयांमध्ये प्रामुख्याने पत्रकारांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील असणे, पत्रकारांचे आरोग्य आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे,पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणाविषयी असलेल्या अडचणी दूर करणे, नव्याने विकसित होत असलेल्या पत्रकारितेचे धडे देणे आणि सेवानिवृत्तीनंतर पत्रकारांची काळजी घेणे यावर भर देण्यात येणार आहे. संपूर्ण देशामध्ये सकारात्मक पत्रकारितेच्या नवनिर्मितीसाठी पुढाकार घेणे हा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेचा मुख्य उद्देश आहे.
त्यांच्या निवडीचे वेगवेगळ्या स्तरातून अभिनंदन होत आहे