Breaking News

परभणी शहर महानगरपालिका अर्थसंकल्प अंदाजपत्रक हे परभणी प्रामाणिक करदात्यासाठी निराशाजनक, पॅकेट नया मालपुरणा, सचिन देशमुख यांची प्रतिक्रिया

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी
परभणी :- परभणी शहर महानगरपालिका सन 2021 22 चे सुधारित अर्थसंकल्प अंदाजपत्रक आज दिनांक 24 मार्च रोजी सादर करण्यात आले यावर,” परभणी परिवर्तन पॅनल पॅनलप्रमुख” सचिन देशमुख आपली प्रतिक्रिया देतांना ते म्हणलेकी परभणीतील प्रामाणिक करदात्यासाठी अर्थसंकल्प निराशाजनक आहे तसेच पॅकेट नया मालपुरणा आहे अशी टीका त्यांनी केली व या संदर्भात एक व्हिडिओ जारी केले त्यात प्रमुख्याने सन 2021 22 चे सुधारित अर्थसंकल्प खालील गोष्टींचा अभाव दिसून आला आहे.
1. महापालिका क्षेत्रामध्ये प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षणावर कोणतीच तरतुदी केलेल्या दिसून येत नाहीत.
2.आरोग्य सुविधा वाढविण्यास संदर्भामध्ये कोणते धोरणात्मक तरतुदी व प्राधान्य दिलेले दिसत नाही.
3. महापालिका आर्थिक सक्षम व्हावावि यासाठी नवीन धोरण आणण्याची गरज असताना याबाबत नियोजन यात दिसून आले नाही.
4. शहरासाठी परिवहन धोरण व पार्किंग च्या संदर्भामध्ये सुद्धा कोणतेच नियोजन दिसून येत नाही.
5. घनकचरा व्यवस्थापनामध्ये कचर्‍यातून उत्पन्न करण्याऐवजी, कचरा उचलणे, विल्हेवाट लावणे प्रक्रिया करणे व जुन्या कचऱ्याला बायोमिनिंग करणे यावर खर्च होत आहे *त्यातून उत्पन्न करण्याचे धोरण नाही.*
6. एलईडी लाईट मुळे महापालिकेचे लाईट बिलची किती बचत झाली व लाईट बिल किती थकित राहिले व त्यावर काय नियोजन आहे याचे तरतुदीत विसंगती आढळते
7. वार्षिक मालमत्ता कर किती आहे हा दर्शविला नाही त्यामुळे अंदाजपत्रका मध्ये दिलेला आकडा हा वाढवून दाखविण्यात आला आहे असे वाटते.
8. पहिले कर्ज न फेडता नवीन कर्ज घेण्याची तयारी दिसून येत आहे,
9. शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अग्निशामक यंत्रणा सक्षम करणे आवश्यक असताना व अग्निशामक यंत्रणा सक्षम करण्यासाठी कोणतेही योग्य नियोजन केलेले दिसतात नाही.
एकंदरीत परभणीतील प्रामाणिक करदात्या नागरिकांनाच्या पदरी निराशा आलेली आहे. भकास अर्थसंकल्पने विकास कसा होईल याकरिता परिवर्तन होणे आवश्यक आहे. हे अविकसित धोरण पाहून परिवर्तन करण्यासाठी आम्ही *परभणी परिवर्तन पॅनलच्या* माध्यमातून शहराचा विकास करण्याचे ध्येय ठेवत आहोत. याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत असे या वेळी त्यांनी सांगितले

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close