Breaking News

सणासुदीच्या काळात लोडशेडिंग,पाणीपूवठा, पूर्ववत, करण्याची “परभणीपरिवर्तन पॉनॉल ची मागणी”

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

                  संपादक :- अकबर सिद्दिकी

परभणी :- एन सणासुदीच्या काळात परभणी महावितरण वीज मंडळाने शहरात लोडशेडींग सुरू केली आहे व तसेच महा नगरपालिकेकडून शहराला होणारा पाणीपुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले असल्याने आज दिनांक 1 एप्रिल रोजी परभणी परिवर्तन पॉनॉल चे प्रमुख सचिन देशमुख यांनी महानगरपालिका आयुक्त व अधीक्षक अभियंता,महावितरण परभणी या दोघांना लेखी निवेदन देऊन शहरातील नागरिकांना सर्व सुविधा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे
दोन वेगवेगळ्या निवेदनात असे म्हणटले आहे की एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सर्वधर्मीय धार्मिक सण – उत्सव आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये महावितरण लोडशेडिंग चालू केलेली आहे त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे आपण राबविलेल्या अभियानास त्वरित थांबवावे व वीज पुरवठा सुरुळीत करावे अशी मागणी करण्यात आली,
महा नगरपालिका ला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पाडवा सण आणि रमजानचा सणाची सुरुवात होत आहे पुढे 14 एप्रिल पण आहे तसेच उन्हाळा ही सुरू होत आहे आणि महापालिकेचे स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिव्यांची नियोजन हे शंभर टक्के विस्कळित झालेले आहे.
आशा कडक उन्हाळ्यात पाडवा आणि रमजान निमित्त नागरिकांना निर्जळी ला समोर जावे लागत आहे. आपण रोज पाणी द्यायचे किंवा दोन दिवसाआड पाणी द्यायचीआश्वाशीत केले होते पण तसे कोणतेही नागरिकांना सोय मिळत नाही. पाण्याला प्रेशर कमी येत आहे. पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण पद्धतीने करून घेणे गरजेचे होते पण त्याकडेही आपले लक्ष दिसून येत नाही असे दिसते.
गेल्या चार दिवसापासून पाणीपुरवठा बंद झाला राठी फिल्टर आणि येलदरी फिल्टर या दोन्ही फिल्टरचे विद्युत पुरवठा एमएससीबीच्या विद्युत बिलाचे पैसे भरले नसल्यामुळे पाणीपुरवठा व दिव्यांचा विद्युत पुरवठा कट केला आहे. वारंवार या महिन्यांमध्ये एमएससीबी ने तिसरी वेळ आहे की महापालिकेचे पथदिवे व पाणीपुरवठा बंद केला आहे.
परभणी शहरातील प्रामाणिक करदात्यांना कर भरून सुद्धा मूलभूत सुविधा आपण देऊ शकत नाहीत. महापालिकेतून नागरिकांनी भरलेल्या पैशाचा वापर हा गुत्तेदारयांचे बिले काढण्यातसाठी होत आहे, असे दिसून येत आहे. यावरून नाईलाजाने नागरिकांना त्रास भोगावा लागत आहे. *परभणी महापालिकेची अजब कहानी कर भरा आणि त्रास घ्या*. अशा पद्धतीने नागरिकाचं शोषण करण्याची पद्धत परभणी शहर महानगरपालिकेने चालू केले आहेत
आपण परभणी शहर महानगरपालिकेचा कारभार हाकत आहात यात नागरिकांना होत असलेला त्रास आपल्या समोर ठेवत आहोत जमलं तर याची नोंद घ्यावी व सणासुदीला नागरिकांना लाईट पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधा द्याव्यात असे या वेळी सांगण्यात आले
या वेळी परभणी परिवर्तन पॅनल प्रमुख सचिन देशमुख माजी नगर सेवक आहात भाई नगरसेवक फारूक बाबा माजी नगरसेवक कलम यांना हरून भाई वहिदा पटेल इनुस भाई मुन्ना शेख महेंद्र साळवे केके भारसाकडे आदी उपस्थित होते

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close