Breaking News

जिंतूरात दोन मुलांनी कचऱ्यातुन वेचून आणलेल्या जिलेटीन कांडीयांचा हातात स्फोट; दोन मुले गंभीर जखमी

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

                संपादक :- अकबर सिद्दिकी

           जिंतूर: शहरातील एकलव्य शाळा परिसरात राहणाऱ्या दोन विद्यार्थी खेळत असताना जिलेटीन कांड्या कचऱ्यात उघड्यावर पडलेल्या असल्याने त्या घेऊन मोबाईलच्या बॅटरीला लावल्या असल्याने मोठा स्फोट झाला यामध्ये 11 व 9 वर्षीय विद्यार्थ्यांच्या हाताला व डोळ्याला गंभीर इजा झाली यामध्ये दोघे हि गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार 13 एप्रिल रोजी सकाळी 12 वाजेच्या दरम्यान घडली असून त्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र एवढ्या स्फोटक कांड्या रस्त्यावर आल्या कोठून असा सवाल उपस्थित असून याबाबत महसूल व पोलीस प्रशासन अनभीज्ञ असल्याचे उघड झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील नवीन एकलव्य शाळा परिसरात राहणारा विद्यार्थी शेख असलम (वय 11 वर्ष ) व अनस शाहेद पठाण (वय 9 वर्ष) हे दोघेजण घराजवळ खेळत असताना रस्त्याच्या बाजूला कचऱ्यात मोठ्या प्रमाणात वायर असलेल्या कांड्या दिसून आल्या यावेळी दोघांनी सदरील  कांड्या उचलून जुन्या मोबाईलच्या बॅटरीला वायर जोडले असता कांडी फुटल्याने मोठा आवाज झाला यावेळी अस्लम शेख याचा हातात सदरील कांडी असल्यामुळे संपूर्ण हाताला मोठी व डोळ्याला गंभीर जखम झाली तर जवळच असलेल्या अनस पठाण याच्याही डोळ्याला गंभीर इजा झाली होती यावेळी परिसरातील नागरिकांनी दोघा जखमींना तातडीने शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते यावेळी डॉ हनिफ खान परिचारिका नलीनी गावीत,घुगे,लॅब टेक्निशन विनोद राठोड,गजानन धोतरे बालाजी नेटके यांनी जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
दरम्यान प्राथमिक माहितीनुसार जिलेटीन सारख्या स्फोटक वस्तु शहरातील नागरीवस्ती मध्ये कशा आल्या या घटनेनंतर नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून ,पोलीस प्रशासन याबाबत अनभीज्ञ असल्याचे दिसून आले. शहरात अशा प्रकारे उघड्यावर जिलेटिन सापडल्याची पहिलीच घटना भेटली आहे. तर या स्फोटक जिलेटिन पदार्थाची जबाबदारी ही संपूर्णपणे पोलीस प्रशासन यांच्याकडे असते अशा पद्धतीने शहरात उघड्यावर जिलेटिन सारखा पदार्थ लहान मुलांच्या हातात सापडत असल्याने याबाबतीत पोलीस प्रशासन किती सतर्क आहे हे दिसून येत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close