जिंतूर मराठी पत्रकार संघाच्या इफ्तार पार्टीत सामाजिक एकात्मतेचे दर्शन

संपादक :- अकबर सिद्दिकी
जिंतूर :- जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याकरिता प्रतिवर्षी प्रमाणे रविवार 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 वाजता पोलीस स्टेशन समोरील पत्रकार भवनमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वसामाजातील समाज बांधवांनी सहभाग नोंदविल्याने सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडून आले.
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तसेच वैचारिक समाजाची निर्मिती करण्यासाठी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक उपक्रम घेण्यात येत असते. मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून संघाच्या वतीने सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याकरिता शहरातील पत्रकार भवनमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. इफ्तार पार्टीत सर्व समाज बांधवांनी एकत्रितरित्या इफ्तार करून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. याप्रसंगी मौलाना तजम्मुल अहेमद खान, मौलाना जलील ताबिश मिल्ली, मौलाना सिरजोद्दीन नदवी, रा.कॉ. युवानेत्या प्रेक्षा भांबळे, तालुका अध्यक्षा मनिषा केंद्रे, सिनेट सदस्य ब्रिजगोपाल तोष्णीवाल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड, कांग्रेस तालुकाध्यक्ष गणेश काजळे, भाजपा तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, नगरसेवक दलमीर पठाण, अक्कु लाला, सत्यनारायण शर्मा, हकीम लाला, सालेह चाऊस आदिंची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष शहेजाद खान तर आभार शेख शकील यांनी मानले.