शाहजेब रियाज चाऊस यांचा पहिला रोजा

संपादक :- अकबर सिद्दिकी
जिंतूर :- जिंतूर शहरातील गुलशन कॉलोनी येथील 7 वर्षीय शाहजेब रियाज चाऊसचा या चिमुकलाने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून मंगळवार 19 एप्रिल रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे.
रमजान महिन्यातील रोजाला मुस्लीम बांधवांमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. म्हणून मुस्लीम बांधव सलग 30 दिवस रोजा ठेवून विविध धार्मिक विधींद्वारे अल्हाची पूर्ण श्रद्धेने आराधना करतात आणि याच महिन्यात चिमुकले ही आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात. याचीच प्रचिती 07 वर्षीय शाहजेब रियाज चाऊसचा चिमुकलाने तापत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वी पूर्ण केल्याने याप्रसंगी सय्यद नईम, सय्यद शकील सर, मौलाना जलील, हाफेस अनिस, सिराज चाऊस, फय्याज चाऊस, सरताज चाऊस,शहेजाद खान, कादिर पठाण, बबलू भाई पत्रकार, मुज्जू सिद्दिकी, अहमद सिद्दिकी सर आदींनी चिमुकल्याचा चे कौतुक व अभिनंदन केले.