पालक मंत्रीच्या हस्ते नितीन बुड्डे हे आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित

संपादक :- अकबर सिद्दिकी
जिंतूर :- जिंतूर येथिल कर्तव्यदक्ष तलाठी व जिंतूर तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष नितीन बुड्डे यांना जिल्हाधिकाऱी कार्यालयाकडून जिल्ह्याचे पालकमंञी धनंजय मुंडे,यांच्या हस्ते
आदर्श तलाठी पुरस्काराने गौरविण्यात आले
1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त परभणी येथे जिंतूर येथिल कर्तव्यदक्ष तलाठी नितीन बुड्डे यांना तालुका व जिल्हा प्रशासनाने त्यांची कामाप्रती तत्परता पाहता खर्च कामगार दीना निमित्त त्यांच्या कामाची पावती म्हणून परभणी जिल्ह्याचे पालकमंञी धनंजय मुंडे यांच्या हसते आदर्श तलाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या वेळी खासदार फौजिया खान,जिल्हाधिकाऱी श्रीमती आंचल गोयल,उपविभागीय अधिकारी श्रीमती संगेवार सह अनेक मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले त्याबद्दल कर्तव्यदक्ष तहसीलदार सखाराम मांडवगडे,मंडळ अधिकारी प्रशांत राखे, विजय बोधने,घुगे,तलाठी होळ,सोनुने,महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.*