सुरेश भैय्या नागरे यांच्या मार्गदर्शनात 3 राज्याच्या क्रिकेट T20 स्पर्धेसाठी जिंतूर येथून मोहसीन क्रिकेट संघ हैदराबादला रवाना

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- बेंगलोर,तेलंगणा व महाराष्ट्र या 3 राज्यां मध्ये खेळल्या जाणाऱ्या भारतरत्न राजीव गांधी राष्ट्रीय T20 स्पर्धेसाठी श्री सुरेश भैय्या नागरे यांच्या मार्गदर्शनात मोहसीन क्रिकेट क्लब हा संघ हैदराबाद आज दि.15 मे रविवार रोजी येथे रवाना झाली असल्याची माही सुरेश भैय्या नागरे यांच्या वतीने देण्यात आली
या बाबत अधिक माहिती अशी की जिंतूर येथील मोहसीन क्रिकेट क्लब हा संघ बेंगलोर,तेलंगणा व महाराष्ट्र या राज्यां मध्ये खेळल्या जाणाऱ्या भारतरत्न राजीव गांधी राष्ट्रीय T20 स्पर्धेसाठी हैदराबाद येथे जात असून श्री सुरेश भैय्या नागरे यांच्या निवासस्थानी मोहसीन क्रिकेट क्लब हा संघाच्या सर्व खेळाडूंचे स्वागत केले. सर्व खेळाडूंच्या येणे – जाणे ची सर्व व्यवस्था सुरेश भैय्या नागरे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आली.या प्रसंगी बोलताना श्री सुरेश भैय्या नागरे यांनी युवकांनी विविध क्रीडा प्रकारात आपले प्राविण्य सिद्ध करावे व त्यासाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा , व ईतर सर्व मदत करणार असल्याचे सांगून त्या सर्व खेळाडूंचे मनोबल वाढविले,या प्रसंगी मोहसीन क्रिकेट क्लब संघाचे निखिल वैष्णव,मुज्जू खान,समीर पठाण, गुड्डू भाई, शाहरुख शेख,सुनील जाधव, अझहर हाजी, सोहेल खान,सुधाकर,इम्रान खान, जावेद शेख,तन्वीर,यासह डॉक्टर निशांत मुंडे,मोहसीन पठाण, पप्पू टाकरस,रावसाहेब खंदारे, जाबेर मुल्ला, ईतर मान्यवर उपस्थीत होते.