*भाजप जिंतूर नगर परिषद निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार–लक्ष्मणराव बुधवंत* *19 जून रोजी बैठकीचे आयोजन*

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर–आगामी येऊ घातलेल्या जिंतूर नगरपरिषदेच्या निवडणुकी संदर्भात भाजप पक्ष सर्व 25 प्रभागात आपले प्रबळ उमेदवार उभे करून नगर परिषद निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार असल्याची माहिती भाजप तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत यांनी आज भाजप संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. येत्या रविवारी 19 जून रोजी दुपारी ठीक तीन वाजता श्रीमती शकुंतला बाई बोर्डीकर महाविद्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर बैठकीस माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब, आमदार मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिका निवडणुकीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
अशी माहितीही लक्ष्मण बुधवंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी झालेल्या बैठकीत लक्ष्मण बुधवंत यांच्यासह नगरपालिका प्रभारी डॉ.पंडित दराडे शहराध्यक्ष दत्ताभाऊ कटारे,भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर, जाधव,मनोहर सातपुते,माधव दराडे,गुणीरत्न वाकोडे,सुमनताई बार्शीकर, प्रदीप कोकडवार,निर्मला बांडे,रोहित देशपांडे,युवराज घनसावध, रमेश मोहिते,मुजम्मिल पठाण,मतीन तांबोळी आदी पदाधिकाऱ्यांसह सर्व पत्रकार बांधव बैठकीस उपस्थित होते.