Breaking News

मुरूमखेडा येथील राष्ट्रीय पेय जल योजनेत सरपंच,पाणी पुरवठा समिती व अधिकारी,गुत्तेदार यांनी 64 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केल्या प्रकरणी पोलिसात गुन्हे दाखल करा, ब्रिजभाऊ तोष्णीवाल

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- जिंतूर तालुक्यातील येलदरी कॅम्प येथील मुरूमखेडा गावात राष्ट्रीय पेय जल योजनेत 64 लाख रुपयाचा पाणी पुरवठा योजनेत बोगस काम करून तत्कालीन सरपंच, पाणी पुरवठा समिती व शासकीय अधिकारी, गुत्तेदार यांनी या सर्वानी संगमत करून 64 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप येथील रहिवासी ब्रिज भाऊ तोषनीवाल यांनी दिनांक 20 जून रोजी त्यांच्या राहत्या घरी एक पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली
याबाबत अधिक माहिती अशी की मुरूमखेडा येथील 200-13 -14 या साली मुरूमखेडा येथील ग्रामस्थांना पीण्याचे पाणी उपलब्ध व्हावा म्हणून राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 64 लाख रुपयाचं पाणी पुरवठा योजनेचे निवेदा काढण्यात आली आणि या कामाला प्रत्यक्षात सुरुवात हि झाली परंतु निवेदा मध्ये ठरलेल्या कोणत्याही बाबींचा,वस्तूचा वापर न करता बोगस व चुकीचे पद्धतीने काम करून कार्यल्यातील नोंद पुस्तकात खोठिय्या नोंदी केल्याचे आरोप तोष्णीवाल यांनी केला आहे,या सर्व बोगस कामा मूळे राज्य पेयजल योजना मधून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले नाही कार्यल्यात बोगस व खोटे व बनावट कागदपत्रे लावून हि योजना ग्रामपंचायत ने ताब्यात घेतले म्हणू शासन दरबारी मांडून या योजनेचे 64 लाख उचलून घेतले व कामात मोठा भ्रष्टाचार झाल्या चा समोर आला आहे याबाबत तोष्णीवाल यांनी पुरावया सहित शासनाकडे तक्रार दाखल केली असून या योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या मध्ये जे कोणी दोषी असेल त्याच्यावर पोलीसात गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली आहे व तसेच मुरूमखेडायातील ग्रामस्थांचा हक्का चा पाणी राष्ट्रीय पेय जल योजनेतून त्यांना उपलब्ध करुन घ्यावे असे या तक्रारीत म्हणटले आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close