बंडखोर आमदारांविरोधात शिव सैनिक रस्त्यावर, परभणीत एकनाथ शिंदे व गुलाबराव पाटील यांचे फोटो गाढवाच्या तोंडावर लावून मिरवणूक

संपादक :- अकबर सिद्दीकी
परभणी :- एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसैनिक दुखावले असून परभणी शहरात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शहरातील शिवाजी चौकात एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांचे फोटो गाढवाच्या तोंडावर बांधून शिवसैनिकानी जोरदार घोषणा बाजी केली. बंडखोर आमदारांविरोधात ते रस्त्यावर उतरले आहेत. परभणी शहरातील शिवाजी चौकात शिवसैनिकांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारां विरोधात जोरदार घोषणाबाजी केली “निम का पत्ता कडवा है एकनाथ शिंदे भडवा ” है अश्या ही घोषणा या वेळी दिल्या, व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तुम आगे बडो अश्या घोषनांनी परिसर दणाणून सोडला , यावेळी बंडखोर आमदारांचा पुतळा जाळून त्यांच्या कृतीचा निषेध केला आहे. यापुढे एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना आम्ही भविश्यात कधीच फिरू देणार नाही असा ईशारा परभणी जिल्ह्याचे शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर यांनी दिला , या वेळी शिवसेनेचे पद्धधिकारी , गंगाप्रसाद आनेराव , अतुल सरोदे , सुशील कांबळे , अर्जुन सामाले , शिवा चव्हाण , सह युवा सेना , व शिवसेने चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते