* जिंतूरात 21 वर्षीय तरुणाचा खून जलनारोडवर चित्तथरारक घटना * मारेकरुंना अटक करण्यासाठी नातेवाईकांचा ठिय्या

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- जिंतूर शहरातील जालना रोडवरील बलसा चौकात पूर्ववैमनस्यातून भरदिवसा एका 21 वर्षीय तरुणाचा चाकू भोसकून खून केल्याची चित्तथरारक घटना गुरुवार 14 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे. मृतदेह रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टर उपस्थित नसल्याने संतप्त नागरिकांनी रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली.
सदरील घटनेविषयी विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेले सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मिर्झा अफरोज बेग, सोमेश्वर चिकटे, योगेश दहिवाल आणि यश राठोड हे चार मित्र बलसा रोडवरील एका धाब्यावर बसलेले होते. त्यांना शहरातील राम मंदिर परिसरातील पाच ते सात जणांच्या गटाने फोनवर संपर्क साधून बलसा चौकात बोलावून घेतले. ते बलसा चौकात आल्यानंतर दोन्ही गटात पूर्ववैमनस्यातून शाब्दिक बाचाबाचीस सुरुवात झाली व काही क्षणातच शाब्दिक भचाबाचीने उग्ररूप धारण करून राम मंदिर परिसरातील गटाने 21 वर्षीय मिर्झा अफरोज बेग याच्या पोटात आणि त्याचे मित्र सोमेश्वर चिकटे याच्या हातावर धारदार शास्त्राने वार केले व घटनास्थळावरून पोबारा केला. धारदार शस्त्राने झालेल्या चित्तथरारक हाणामारीत 21 वर्षीय मिर्झा अफरोज बेग याचा जागीच मृत्यू झाला तर सोमेश्वर चिकटे गंभीररित्या जखमी झाले आहे. मृत्यूदेह रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टर उपस्थित नसल्याने संतप्त नागरिकांनी रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली. काहीक्षनातच रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमा झाला होता. पोलीस उपविभागीय अधिकारी गोफणे, सपोनि कोकाटे, चौरे, पोमनाळकर, पोउपनि गाडेकर, जमादार जोगदंड, पो कॉ जिया खान आदींनी रुग्णालयात जमलेल्या जमलेल्या जमावाला पांगविले.
हे हि वाचा
धारदार शस्त्राने 21 वर्षीय मिर्झा अफरोज बेग याचा निर्घृण खून करून फरार झालेल्या मारेकरुंना तात्काळ अटक करा अन्यथा मृतदेहाचा शवविच्छेदन करू देणार नाही असा आक्रमक पावित्रा घेऊन मयताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले.